Interview असो, office असो की मुलांची शाळा — इंग्रजीत बोलताना आता अडखळायचं नाही. अगदी zero पासून — सोप्या, सहज समजणाऱ्या Natural English मधून.
काही शंका? Helpline वर call करा — 70661 55355 किंवा WhatsApp करा
शाळेत दहा-बारा वर्षं इंग्रजी शिकलो, Tense पाठ केले, तरी चार वाक्यं बोलताना जीभ अडखळते. आणि या एका अडचणीमुळे नोकरी, promotion, ओळखी — कितीतरी संधी हातातून जातात. याचं कारण तुम्ही नाही.
पाठ केलेले शब्द ऐन बोलायच्या वेळी गायब होतात.
डोक्यात आधी मराठी वाक्य, मग भाषांतर — तोपर्यंत समोरचा पुढे गेलेला असतो.
Rules माहीत आहेत, पण तोंडातून वाक्य बाहेर पडत नाही.
लोक हसतील या भीतीने बोलणंच टाळता.
इंग्रजी बोलता येणं म्हणजे परीक्षा पास होणं नाही. ते म्हणजे दारं उघडणं — जी आजपर्यंत फक्त एका भीतीमुळे बंद होती.
"Tell me about yourself" ऐकल्यावर घाम नाही — स्वतःबद्दल ठामपणे बोलता येतं.
Meeting मध्ये गप्प न बसता मत मांडता येतं. Promotion च्या शर्यतीत मागे राहत नाही.
मुलांचा अभ्यास घेता येतो, शाळेत teachers शी बिनधास्त बोलता येतं.
Mall, hospital, bank, प्रवास — कुठेही इंग्रजी ऐकून दडपण येत नाही.
मोठ्या शहरात नोकरी, freelancing, स्वतःचा business — पर्याय वाढतात.
"मला जमत नाही" हे वाक्य आयुष्यातून कायमचं निघून जातं.
खालच्यापैकी 2-3 गोष्टी तुम्हाला लागू होत असतील, तर हा मार्ग तुमच्यासाठीच बनवला आहे.
हे आम्ही प्रामाणिकपणे सांगतो, कारण चुकीच्या अपेक्षेने आलेला विद्यार्थी निराश होतो — आणि ते आम्हाला नको आहे.
जर तुम्ही इथे पहिल्यांदा आला असाल
जर पुस्तक घेतलं आहे, किंवा थेट course बघायचे आहेत
अजून ठरत नाही? 70661 55355 वर call करा — तुमच्यासाठी योग्य पायरी आम्ही सांगू.
GET UP & CTV ही अमोल सरांनी स्वतः तयार केलेली चौकट आहे. प्रत्येक अक्षर म्हणजे एक secret — जे समजलं की इंग्रजीकडे बघण्याची नजरच बदलते.
Rules पाठ करून भाषा येत नाही — ऐकून येते.
आजूबाजूला इंग्रजी नाही? ते घरबसल्या तयार करता येतं.
मराठी → इंग्रजी भाषांतराची सवय मोडली की बोलणं वेगात येतं.
आधी समजणं, मग बोलणं — हा नैसर्गिक क्रम आहे.
मेंदूचा इंग्रजी समजण्याचा वेग वाढवता येतो.
Confidence हे परिणाम आहे — योग्य सरावाने आपोआप येतो.
थेट इंग्रजीत विचार करायची सवय लावता येते.
पाठ केलेले शब्द विसरतात; गोष्टीतून आलेले शब्द टिकतात.
एक गोष्ट. पुन्हा पुन्हा ऐकायची. मग स्वतःच्या शब्दांत सांगायची. एवढं सोपं — पण मनापासून करायचं.
सोप्या, रोजच्या इंग्रजीतली गोष्ट audio मध्ये ऐका. Text पाठ करायचा नाही.
अवघड शब्द गोष्टीतूनच समजावले जातात — dictionary घेऊन बसायची गरज नाही.
त्याच गोष्टीवर सोपे प्रश्न — उत्तरं देता देता वाक्यरचना आपोआप डोक्यात बसते.
तीच गोष्ट आज, काल आणि उद्याच्या भाषेत स्वतःच्या शब्दांत सांगा. इथे बोलणं सुरू होतं.
कुठून सुरुवात करायची हा गोंधळ नको. हा क्रम पाळा.
8 secrets समजून घ्या. सोबत अमोल सरांच्या आवाजातलं audiobook App मध्ये.
पुस्तक घेतल्यावर लगेच बघायचं खास सत्र. पद्धत नक्की कशी काम करते ते इथे समजतं.
दर रविवारी रात्री 9 वाजता live सत्र — सगळ्यांसाठी खुलं.
63 दिवस: पहिले 21 दिवस भाषांतराची सवय मोडणे, पुढचे 21 दिवस इंग्रजीत विचार, शेवटचे 21 दिवस बोलण्याचा सराव. शेवटी ध्येय एकच — न अडखळता, स्वतःच्या शब्दांत बोलणं.
इंग्रजी का येत नाही, हे एकदा नीट समजलं की अर्धी लढाई जिंकलेली असते. उरलेली अर्धी कशी जिंकायची — तेही या पुस्तकात, सोप्या मराठीत.
2 दिवसांत dispatch, 7–10 दिवसांत घरपोच. 15 दिवसांत न मिळाल्यास दुसरी प्रत पाठवू; 30 दिवसांतही न मिळाल्यास पूर्ण refund.
3 Levels, 30 lessons. प्रत्येक lesson एका रोजच्या प्रसंगावर — ओळख करून देणं, दिनक्रम, खरेदी, interview, फोनवर बोलणं...
Self Introduction, Daily Routine, Shopping, Ordering Food, Directions — रोजच्या बोलण्याचा पाया.
Course बघा →भावना व्यक्त करणे, मतं मांडणे, कुटुंब, झालेले प्रसंग सांगणे, सल्ला देणे.
Course बघा →Phone वर बोलणं, समजावणं-पटवणं, बातम्यांवर चर्चा, आठवणीतली गोष्ट सांगणे.
Course बघा →गोष्टींमध्ये भेटतील — Raj, त्याची हुशार म्हैस Champa, चोरटी माकडीण Pinky, Dagdu Seth आणि Madam Fifi. हसत-खेळत इंग्रजी.
Monthly Plan — ₹899 पासून | मराठी आणि हिंदी batches | VIP Mentorship Batch सुद्धा उपलब्ध
Mobile वर App वापरा, किंवा computer वर थेट website वरून login करा. दोन्हीकडे account एकच.
App डाउनलोड किंवा login मध्ये अडचण? Helpline: 70661 55355
WhatsApp वर विचारामराठी माणसाने फक्त इंग्रजीमुळे एकही संधी गमावू नये — हेच माझं ध्येय.
Dr. Stephen Krashen यांच्या Language Acquisition संशोधनाच्या आधारे त्यांनी स्वतः इंग्रजी आत्मसात केलं आणि आज त्याच पद्धतीने शिकवतात. E Swayam Academy चे संस्थापक आणि "GET UP & CTV — 8 Hidden Secrets" या पुस्तकाचे लेखक.
विश्वास बसायला वेळ लागतो, हे आम्हाला माहीत आहे. आधी पद्धत बघा, मग निर्णय घ्या.
दर रविवारी रात्री 9 वाजता. पद्धत समजून घ्यायचं सगळ्यात चांगलं ठिकाण.
Register करा →हो. ही पद्धत zero पासून सुरू होते. Lessons इतक्या सोप्या, हळू आणि Natural English मध्ये असतात की ऐकत-ऐकतच इंग्रजी समजायला लागतं. Dictionary किंवा भाषांतराची गरज पडत नाही.
बोलण्यासाठी Grammar चे rules पाठ करायची गरज नाही. योग्य वाक्यरचना गोष्टी ऐकत आणि सांगत आपोआप डोक्यात बसते — जशी मराठी बसली. ही पद्धत Dr. Stephen Krashen यांच्या Input संशोधनावर आधारित आहे.
रोज किमान 1 तास. एकदम शक्य नसेल तर 15-15 मिनिटांचे चार भाग करा. सातत्य हेच सगळ्यात महत्त्वाचं.
पुस्तक घेताच तुमचं account तयार होतं. नवीन Register न करता, order करताना दिलेल्या mobile नंबरने थेट Login करा.
2 दिवसांत dispatch होतं आणि साधारण 7–10 दिवसांत घरी पोहोचतं. तोपर्यंत App मधलं audiobook आणि "पहिलं पाऊल" सुरू करू शकता.
Admission फक्त English with Amol App मधून होतं. Batch ची तारीख आणि fee App मध्ये दिसेल.
हिंदी बोलणाऱ्यांसाठी वेगळं page आहे — इथे क्लिक करा.
तो बदल आज एका पुस्तकाने सुरू होतो. पहिलं पाऊल तुम्ही उचला — रस्ता आम्ही दाखवतो.